बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! गुजरातमध्ये गॅस गळतीमुळे 6 जणांचा मृत्यू

गांधीनगर | गुजरातमधील सुरत  (Gujrat) येथून एक धक्कादायक घटना  समोर आली  आहे. एका प्रिंटीग प्रेसमध्ये गॅसगळती (gas leakage in Printing press) झाल्याने मोठा अपघात घडला आहे. यामध्ये 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरतमधील जीआयडीसी परिसरातील प्रिटींग प्रेसमध्ये हा अपघात घडला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आहेत. कंपनीजवळ असलेल्या नाल्यात एक टँकरचालक केमिकल टाकत होता. त्यामधून विषारी वायूची गळती झाल्याने हा अपघात घडला.

टँकरचालक केमिकल टाकत असताना अनेक कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागला होता. कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र गॅस गळतीने हा त्रास होत आहे. हे समजेपर्यंत फार उशीर झाला होता. तोपर्यंत 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीमधील इतर कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. त्याचप्रमाणे पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तर रुग्णलयातील 20 जणांवर उपचार सुर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी पोहचवलं?’, स्मृती इराणींचे काँग्रेसवर गंभीर आरोप

“… मी जिवंत पोहचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा”

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More