बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जासह मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 6 मोठे निर्णय

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बळीराजाला दिलासादायक असाही निर्णय आहे. त्यामध्ये नियमित पिककर्जाची परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने दिलं जाणार आहे.

महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शहारातील प्राचीन आणि अतिप्राचीन वृक्षांचं संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. हेरिटेज ट्री संकल्पना अंमलात आणली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे.

यासह दुय्यम न्यायालय आणि मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमण्यात येणार आहे. यासह नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आयटीआय विकसित करण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाने राज्यातील शेतकरी सुखावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिमता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More