Ajit Pawar l लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. यामुळे अजित पवार गटावर वेगवेगेळे आरोप करण्यात येत आहेत. अजित पवार गटाची एक जागा निवडणून आल्याने त्यांच्या आमदारांची देखील धाकधूक वाढली असल्याचं बोललं जात आहे.
रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार काय म्हणाले? :
या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा केला होता. मात्र रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. रोहित पवारांच्या या दाव्यानंतर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.
रोहित पवारांच्या या आरोपावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या (अजित पवार गटाच्या) सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. मला सर्व आमदारांनी सांगितले आहे की, आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहोत. हे सर्व आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातच राहणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा आमचा परिवार आहे. हा परिवार आम्ही कायम पुढे घेऊन जाऊ असं मला आमदारांनी सांगितलं आहे,असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit Pawar l राष्ट्रवादीच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित :
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या. त्यातील फक्त एका जागेवर म्हणजेच रायगड जागेवर अजित पवार यांना विजय मिळवता आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 जून रोजी आपल्या सर्व आमदारांची एक बैठक बोलावली होती.
या आमदारांच्या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देखील झाली आहे. मात्र या बैठकीला तब्बल सहा आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे ते सहा आमदार नाराज आहेत की काय? असे अनेक तर्कवितर्कांना उधाण आल आहे. यममध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अहेरीचे धर्मराव बाबा अत्राम, पिंपरीचे अण्णा बनसोडे, वडगाव शेरीचे सुनिल टिंगरे, सिंदखेड राजाचे राजेंद्र शिंगणे, माढ्याचे बबन शिंदे अशी बैठकीला अनुपस्थित असलेल्या आमदारांची नावे आहेत.
News Title – 6 MLAs of Ajit Pawar group are upset
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत
“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’
‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा
“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ