बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

नागपूर | नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीसह 66 वर्षीय वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे.  या दोघांसह एकूण 9 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भोये यांनी कोरोना रुग्णाना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. कोविड संसर्गमुक्त  झालेल्या रुग्णांत रजाळे येथील चिमुकलीसह 28 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा तसेच 31, 35 आणि 66 वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारीदेखील संसर्गमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 28 असून  3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य 3 कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

कोरोना हा रोग उपचाराअंती बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

रेल्वेत एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही; रेल्वेमंत्र्यांचा दावा

कोरोनाविरोधी लढ्यात केरळची महाराष्ट्राला मोलाची मदत, मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More