बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला

पुणे | एक काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. एका सहा वर्षीय मुलाचा (Boy) खेळता-खेळता मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार त्याच्या आईच्या डोळ्यांसमोर घडला. युवान दौंडकर असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.

युवानची आई वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी थांबली होती. शेजारील गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात त्या युवानसह बसल्या होत्या. दुकानात मिळालेल्या सिसिटिव्हीवरून युवान आपल्या आईशी बोलत होता.

अचानकपणे तेथे असलेल्या ग्रॅडरसोबत खेळण्यासाठी तो गेला. ग्रॅडरसोबत झोका खेळायचा प्रयत्न युवान करत होता. आणि अजानक तो ग्रॅडर (Grinder) युवानच्या अंगावर पडला. आणि तो बेशुद्ध पडला.

त्यांची आई आणि तेथील उपस्थितांनी युवानला हाॅस्पिटलला नेलं. पण उपचारापूर्वीच युवानचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. या मशिनचे वजन साधारणपणे 20-30 किलो असल्याचं तेथील कामगारांनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य

उद्धव ठाकरेंभोवतालच्या ‘त्या’ कोंडाळ्यात कोणते नेते?, शहाजीबापू पाटलांनी यादीच सांगितली

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप वापरताय तर ‘या’ गोष्टीचं पालन अनिवार्य, अन्यथा होऊ शकते कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More