Top News

धक्कादायक! पुण्यातील कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

पुणे | कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाचा धसका बहुतांश नागरिकांनी घेतला असावा. मात्र पुण्यातील कोविड उपचार केंद्रात नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका 60 वर्षीय कोरोनाबाधीत रूग्णानं उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या या रूग्णाचा नुकताच कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला होता. यानंतर त्याला उपचार केंद्रात दाखल करून घेण्यात आले. त्याच्यासोबत दोन कोरोनाबाधीत रूग्णदेखील खोलीत राहायला होते.

सकाळी 10 च्या सुमारास बाकीचे बाधीत रूग्ण शेजारील खोलीत नाश्ता करण्यासाठी गेले. यावेळेत या 60 वर्षीय रूग्णानं पंख्याला गळफास घेत आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आनंदाची बातमी…. गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी- राजेश टोपे

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महत्वाच्या बातम्या-

“…तर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल”

आश्चर्यकारक! ‘या’ गावात शेतकऱ्यांना रविवारी असते सुट्टी

‘भरल्या डोळ्यांनी तुझा हेल्मेटमधला चेहरा पाहिला की…’, या खेळाडूने धोनीला लिहीलं मराठीतून पत्र!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या