युवक काँग्रेसमध्ये खळबळ; ‘या’ कारणामुळे 60 पदाधिकाऱ्यांना केलं तडकाफडकी कार्यमुक्त

60 Youth Congress Office Bearers Suspended for Skipping RSS HQ Protest

Youth Congress | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे  आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला दांडी मारल्याच्या कारणावरून प्रदेश युवक काँग्रेसने ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे.

या कारवाईमुळे युवक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (State President Kunal Raut) यांच्याविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये ‘या’ पदाधिकाऱ्यांचा समावेश

कार्यमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये उपाध्यक्ष तनवीर विद्रोही (Tanveer Vidrohi), महासचिव शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar), केतन ठाकरे (Ketan Thakre) आदींचा समावेश आहे.

नेमके काय घडले?

सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांच्या एका वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसने  रविवारी (दि. १९) आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात युवक काँग्रेसचे (Youth Congress) राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब (National President Udaybhanu Chib), प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (State President Kunal Raut) यांच्यासह काही मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात ५० पेक्षा कमी कार्यकर्ते उपस्थित होते. बहुतांश प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेच नाहीत.

महाराष्ट्र प्रभारी श्रीनिवास नालमवार (Maharashtra In-charge Srinivas Nalamwar) यांनी घेतली गंभीर दखल

या सर्व घटनाक्रमाची महाराष्ट्र प्रभारी श्रीनिवास नालमवार (Maharashtra In-charge Srinivas Nalamwar) यांनी गंभीर दखल घेतली आणि आंदोलनाला दांडी मारणाऱ्या ६० पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.

युवक काँग्रेसमध्ये (Youth Congress) असंतोष

या कारवाईमुळे युवक काँग्रेसमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या कार्यपद्धतीवर अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे आगामी काळात युवक काँग्रेसमध्ये (Youth Congress) फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Title : 60 Youth Congress Office Bearers Suspended for Skipping RSS HQ Protest

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .