महाराष्ट्र मुंबई

तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंतांची सरकारकडे मागणी

मुंबई | भीमा कोरेगावप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेले आंबेडकरी विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यावर झालेल्या कारवाईवर अमेरिका-युरोपमधील तब्बल 600 विचारवंतांनी जाॅईंट स्टेटमेंटद्वारे निषेध व्यक्त केला आहे. बिझनेस स्टँडर्डने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

तेलतुंबडे हे प्रतिष्ठीत विचारवंत, नागरी हक्क कार्यकर्ते आहेत. शासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी मागणी परदेशी विचारवंतांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये करण्यात आली आहे.

पोलिसांनी तेलतुंबडेंवर केलेली कारवाई चुकीची असून हा लोकशाहीवर घातलेला घाला आहे, असंही स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, विचारवंत तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

नासाने उलगडलं पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य!

“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”

-कार्यकर्त्यानं रचलेलं गाणं ऐकूण उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू!

“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”

-संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या