बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेच्या घरात 62 जिवंत काडतुसं सापडली; NIA चा मोठा खुलासा

मुंबई | सचिन वाझे या निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे असलेली कोठडी आज संपणार असल्याने त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. मनसुख हत्या प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला सचिन वाझे विरोधात अनेक सबळ पुरावे मिळाले आहेत.

सचिन वाझेच्या घरामध्ये 62 जिवंत काडतुसं सापडली असल्याने आता त्याच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाल्याचं समजतंय. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. यामध्ये, जिवंत काडतुसं घरात का ठेवली? याचं उत्तर सचिन वाझे देत नसल्याचं सांगितलं.

आज न्यायालयात हजर केल्यानंतर एनआयएने सचिन वाझे हे चौकशीला योग्य तो प्रतिसाद देत नाहीत आणि तपासातही सहकार्य करत नाहीत असं न्यायालयाला सांगितलं. शिवाय मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आज एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हिरेन सीएसटीजवळ वाझे चालवत असलेल्या मर्सिडीजमध्ये बसून जात असताना दिसत आहेत.

सचिन वाझे हे स्वतः पोलिस अधिकारी असल्याने ते तपास यंत्रणेला सहकार्य करत नसावे तसेच तपास कसा चालतो हे एकंदर माहिती असल्यानेही ते सहकार्य करत नसावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन गोष्टींचा खुलासा होत असताना सचिन वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या  –

आव्हाडांनी रश्मी शुक्लांवर केलेल्या गंभीर आरोपांवर प्रविण दरेकर म्हणाले…

‘या’ कारणाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबत ठरलेली आजची भेट झाली रद्द!

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का- नाना पटोले

“तक्रार करणाऱ्यांचा आणि माझा इतिहास तपासा, गेली 25 वर्ष मी संसदेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय” – अरविंद सावंत

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More