बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

भुवनेश्वर | सध्या देशात सर्वत्र कुक्कुट पालनाचा व्यवसाय जोरात वाढताना दिसत आहे. कुक्कुट पालनाच्या व्यवसायामध्ये अनेक समस्या उद्भवतात असतात. त्यामुळे व्यवसायिक कोंबड्यांची जास्त काळजी घेतात. अशातच आता ओडिसामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. (63 hens die due to DJ noise)

ओडिसाच्या बालासोर जिल्हयातील कंडागराडी गावात राहणाऱ्या एका वक्त्याने कोंबड्यांच्या मृत्यूला डीजे कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. रणजीत परिदा असं या व्यक्तिचं नाव आहे. ते पोल्ट्रीचा व्यवसाय चालवतात. त्यांच्या पोल्ट्री फार्ममधील 63 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी त्यांच्या गावात एक लग्न होतं. त्यावेळी त्या लग्नात डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या त्या कर्कश आवाजामुळे पोल्ट्री फार्ममधील 63 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार रणजीत परिदा यांनी केली आहे. डीजेच्या दणदणाटीमुळे कोंबड्यांना त्रास झाला आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे.

दरम्यान, वरातीत सहभागी असणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी माझा अपमान केला आणि आवाज देखील कमी केला नाही. त्यानंतर मेलेल्या कोंबड्यांची भरपाई मागितली तेव्हा देखील त्यांनी नकार दिल्याचं रणजीत परिदा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

पत्नीच्या खुलास्यानं सोलापूर हादरलं, अश्लील व्हिडीओ पाहून पती…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More