एक विवाह ऐसा भी!!! 65 वर्षीय सासऱ्याने केलं 21 वर्षीय सुनेशी लग्न

बिहार | एका 65 वर्षीय व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय होणाऱ्या सुनेशी लग्न केलं आहे. या लग्नाची बातमी समजल्यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. 

65 वर्षीय रोशन लाल यांच्या मुलाचे लग्न एका मुलीशी ठरले होते. वडिलांच्या भितीने त्याने लग्नाला होकार दिला. मात्र दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याने एेनवेळी त्यानं लग्नमंडपातुन पळ काढला.

लोकांसमोर प्रतिष्ठा राखण्यासाठी रोशन लाल यांनी थेट होणाऱ्या सुनेसोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी त्यावर चर्चा करत सहमती दर्शवली. 

दरम्यान, असं हे लग्न तर पार पडलं मात्र या दोघांच्या वयातील अंतर अधिकच असल्याने त्यांचं लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशाच्या इसमाला अटक

-भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय?; फडणवीस आणि खडसेंचा एकत्र प्रवास

-विरोधक विनाकारण दुष्काळ असल्याचा आरोप करत आहेत- रावसाहेब दानवे

-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राच्या तडाख्यात सापडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-मोदी सरकारमधील मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप