झुनझुनवालांनी ‘या’ 2 कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 650 कोटी

मुंबई | भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjunvala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला याही शेअर बाजारात भरपूर काम करत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ₹650 कोटींपर्यंत वाढली आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या दोन समभागांमध्ये झालेली वाढ.

अलीकडेच रेखा झुनझुनवालाने अवघ्या 2 आठवड्यात 1000 कोटींची कमाई केली आहे. ही बातमी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 2 फेब्रुवारी रोजी टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 2310 रुपये होती, जी 2535 रुपये झाली. अशाप्रकारे या शेअरची किंमत अवघ्या दोन आठवड्यात 225 रुपयांनी वाढली आहे.

डिसेंबर 2021 मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर, स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या रेखा झुनझुनवाला यांचे पती राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स किंवा 17.50 टक्के स्टेक होते.

आता राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर हे शेअर्स त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे गेले आहेत. त्यानुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे 10,07,53,935 शेअर्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-