बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनाकाळात ‘या’ जिल्ह्यातील 69 अल्पवयीन मुली बेपत्ता; सोशल मीडिया कारणीभुत?

नाशिक | भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारतर्फे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच बरेच जण तणावाखाली अजूनही जगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील तब्बल 69 अल्पवयीन मुली कोरोना काळामध्ये बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे मुली घरातून निघून गेल्या असाव्यात, असा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिक पोलिसांनी 69 मुलींपैकी 07 मुलींचा शोध घेतलेला आहे. याप्रकरणी मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचा शोध घेणे सुरू आहे. पण कोरोनाकाळात मुली बेपत्ता नेमका कशामुळे झाल्या? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शिवाय सर्व मुली या अल्पवयीन असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

थोडक्यात बातम्या

“शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा”

कसोटी विश्वचषकाच्या फायनलवर पाणी; सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

कोरोनानंतर आता ‘निपाह’चा धोका?; राज्यात प्रथमच वटवाघूळांमध्ये आढळला निपाह व्हायरस

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More