बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय लष्करातील सात निवृत्त अधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली |  भारतीय लष्कराच्या 7 निवृत्त अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेश केला.

आम्ही निवृत्त झालेलो असलो तरी अजून थकलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे, अशी भावना यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लष्कराचे माजी उपप्रमुख लेफ्ट. जनरल जेबीएस यादव आणि लेफ्ट. जनरल एस. के. पट्याल यांनी भाजप प्रवेश केला आहे.

जनरल आर. एन. सिंग, लष्करच्या माहिती आणि आयटी सेवेचे माजी महानिदेशक लेफ्ट. जनरल सुनित कुमार, लेफ्ट. जनरल नितिन कोहली, निवृत्त कर्नल आर. के. त्रिपाठी, निवृत्त विंग कमांडर नवनीत मगन  यांचाही भाजप प्रवेश झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

-देशात प्रथमच सरकारच्या बाजूने लाट; नरेंद्र मोदींचा विश्वास

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेने दिले ‘हे’ महत्वाचे पद

किशोरवयीन मुला-मुलीचे सहमतीचे ‘सेक्स’ गुन्हा मानू नये- न्यायालय

-यापुढे एखाद्यासमोर बोट पुढे करताना मला विचार करावा लागेल- शरद पवार

-मनसेप्रमाणे राष्ट्रवादीची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More