पुणे महाराष्ट्र

पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता

पुणे | पुण्याच्या हडपसर भागातील सातव आणि मगर या दोन कुटुंबातील सात जण अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे.

सातव आणि मगर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. हे दोन्ही कुटुंब पानशेतला फिरायला गेले होते. खडकवासलामधील अॅक्वेरियस हॉटेलमध्ये राहिले होते. बुधवारी दुपारी 11 वाजता मगर यांच्या पत्नीचा बहिणीशी संपर्क झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंब संपर्कात नाहीत. 

दरम्यान, दिवसभर शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

कुटुंबाची माहिती-

सातव कुटुंबात जगन्नाथ सातव त्यांची पत्नी आणि 5 वर्षांचा मुलगा असे आहेत. तर मगर कुटुंबात सिद्धार्थ मगर, त्यांची पत्नी आणि 5 वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!, 

-केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना का मिठी मारली?; राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला खुलासा

-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद

-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या