बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; पुुण्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू

पुणे | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विशेषत: पुण्यात. पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. कुठे लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये तर काहींना स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा. अशात पुण्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यात गेल्या 15 दिवसांत एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाची लागण होत गेली. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.

लॉकडाऊन असून देखील अनेक नागरिक कोरोना नियम मोडतांना दिसत आहे. यामुळे पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतली दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जिवंत असताना रुग्णालयात उपचारासाठी रांगेत उभं राहायचं आणि प्राण गेल्यानंतरही अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभं राहायचं असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राकडून मी तुम्हाला विनंती करतो, राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करा- जितेंद्र आव्हाड

…म्हणून मुलीनंच घरच्यांच्या जेवणात मिसळलं विष; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

आज मुंबई-हैदराबाद आमने-सामने; सलग पराभवाचा सामना करणाऱ्या हैदराबादला पहिल्या विजयाची आशा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”

“भन्नाटच… मला मैदानात असे 11 जडेजा पाहिजेत”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More