औरंगाबाद महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव: संशयित रूग्णांची संख्या तब्बल 7वर

Loading...

औरंगाबाद| कोरोनानं संपूर्ण देशात तसंच राज्यात धुमाकूळ घातला असतानाच आता औरंगाबाद शहरातदेखील कोरोनानं शिरकाव केलेला आहे. औरंगाबादमध्ये तब्बल 7 कोरोना संशयित रूग्ण आढळून आले आहेत.  त्यांची कोरोना चाचणी झालेली आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.

यापूर्वी औरंगाबादमध्ये  2 संशयित रूग्ण आढळले होते, त्यातील 1 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याच समोर आलं होतं. मात्र काल एका दिवसात औरंगाबाद शहरात तब्बल 5 कोरोना संशयित आढळून आल्यामुळं संपूर्ण औरंगाबाद शहरात चिंतेचं वातावरण आहे. या 7 रूग्णांवर औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

Loading...

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 42वर पोहोचली आहे. संपूर्ण राज्यभर भितीचं वातावरण आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. विविध माध्यमातून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवाहन केलं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

रस्त्यावर थुंकल्यास आता भरावा लागणार तब्बल इतका दंड!

महत्वाच्या बातम्या-

जनतेला धोका देणाऱ्या आमदारांना चौकात फटके द्यायला हवे- हार्दिक पटेल

कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून शरद पवारांना बोलवणं; 4 एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश

सर सलामत तो पगडी पचास; आव्हाडांचं कोरोनापासून वाचण्यासाठी आवाहन

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या