Top News आरोग्य कोरोना

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने कहर केलाय. दरम्यान गेल्या दोन आठवड्यांच्या काळात ब्रिटनमधून दिल्लीत 7 हजार प्रवासी आले असून यांच्यासाठी दिल्ली सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

दरम्यान दिल्ली सरकार आता ब्रिटनमधून दिल्लीत आलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या घरी जाणार आहे. आणि घरी जाऊन प्रत्येकाचा आरोग्याची तपासणी करणार आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या सांगण्याप्रमाणे, ब्रिटनवरून आज सकाळी तसंच सोमवारी रात्री दिल्लीत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आलीये.

“ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार सर्तक आहे. संपूर्ण परिस्थितीवर दिल्ली सरकारचं लक्ष आहे. याशिवाय विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती,” देखील सत्येंद्र जैन यांनी दिलीये.

थोडक्यात बातम्या-

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना

कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!

“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या