Pune | गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटलं जातं. याच गदिमा यांचं स्मारक उभारण्याचा विषय 40 वर्षांहून अधिक काळ रखडला होता.
या शब्दमहर्षीचे महात्म्य महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांना कळणं महत्त्वाचं आहे. याच विचारातून गदिमांच्या स्मृती जागवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 2017 मध्ये त्यांचं स्मारक उभारण्याचं ठरवलं.
कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे क्रमांक 69-70 हा सुमारे 10 एकराचा भूखंड स्मारकासाठी निश्चित झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्यासाठी मंजुरी दिली. गदिमांच्या शताब्दीला सुरवात होताना कोथरूडमध्ये झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी, स्मारकासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे हे स्मारक कागदावरच राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ग. दि. माडगळूकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली.
चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांने निर्देश
स्मारकाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, असे निर्देश देखील चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच गदिमांच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभे राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. यानंतर स्मारकाच्या कामाने चांगलाच वेग घेतला. चंद्रकांत पाटलांमुळे गदिमांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली.
एक्झिबिशन सेंटर, गदिमा स्मारक, छोटे नाट्यगृह अशी ही इमारत असणार होती. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने स्मारकाचे काम रखडवले. 2022 मध्ये सत्ताबदल झाला आणि या स्मारकाच्या पूर्ततेचा चंद्रकांतदादा पाटील यांनी अक्षरशः ध्यास घेतला. हे काम तातडीने पूर्ण झालंच पाहिजे, अशी तंबीच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण
आता स्मारकाचं जवळपास 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. चंद्रकांतदादा स्वतः बांधकामाकडे लक्ष ठेवून आहेत. लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून गीतरामायणकार गदिमांच्या स्मृती जाग्या होतीलच, पण सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचाही गौरव वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा
राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, ‘या’ नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”
लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा