देश

70 वर्षीय शेतकऱ्याचा सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान मृत्यू!

सोनीपत | दिल्ली-हरयाणामधील सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या एका 70 वर्षीय शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला आहे. सिंघू सीमेवर मृत्यू झालेला शेतकरी हा पंजाबमधील मोहालीचा राहणारा होता. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

सिंघू सीमेवर उषय टॉवर येथे हा शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होता. आज सकाळी हा शेतकरी मृत आढळून आला.

शेतकऱ्याच्या मृत्युची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. शेतकऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेला हा दुसरा शेतकरी आहे. याआधी एक आठवड्यापूर्वी हरयाणातील 32 वर्षीय शेतकरी मृतावस्थेत आढळून आला होता.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा”

नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार

प्रतिक्षा संपली! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी मुहूर्त सापडला

“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”

चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या