देश

योगा करताना त्रास झाला, 73 वर्षीय वृद्धेनं जीव गमावला!

डेहराडून | 21 जूनला योगदिनी योगा करताना 73 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे आयोजित केलेल्या योग प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. 

या कार्यक्रमात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व सामील होते. योगा करत असताना या महिलेला अचानक त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना लगेचच रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याचे डेहराडूनचे पोलिस अधीक्षक प्रदीप राय यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल

-अतिउत्साही मोदी भक्तांना अमित शहांनी दिले नम्रतेचे धडे!

-मुख्यमंत्र्यांकडून कामाचं कौतुक अन् सभागृह गळायला लागलं!

-नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत!

-भाजपचा राज्य फोडण्याचा डाव आहे!- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या