PM Narendra Modi | आज 15 ऑगस्ट भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण झालं. यावेळी मोदींनी देशभरातील युवकांसाठी मोठी (PM Narendra Modi)घोषणा केली.
“आपल्या देशातील तरुणांना शिक्षणासाठी विदेशात जावे लागते. त्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी लाखों रुपये खर्च करावे लागते. पण, आता मध्यम वर्गीयांचा हा खर्च वाचणार आहे. आपल्याच देशात उत्तम शिक्षण संस्था निर्माण करण्याचा आमचा ध्यास आहे. पुढच्या पाच वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नव्या जागा निर्माण केल्या जातील”, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.
“वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नव्या जागा निर्माण करणार”
60 वर्षांनंतर सातत्याने तिसऱ्यांदा जनतेनं आम्हाला देशसेवेची संधी दिली आहे. माझ्या 140 कोटी देशवासीयांनी जे आशीर्वाद दिले आहेत, त्यात माझ्यासाठी एकच संदेश आहे,जनतेची सेवा. प्रत्येक परिवाराची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करणं. मी देशवासीयांसमोर नतमस्तक होतो. आपल्याला नव्या उत्साहाने काम करायचं आहे. जे झालंय, त्यावर समाधानी मानणारे आपण नाहीत. आपले संस्कार वेगळे आहेत. नवी क्षितिजं पार करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे.(PM Narendra Modi)
मी तरुणांना आवाहन करतो की, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याबाबत सरकारांना लिहून पाठवा. आज सरकारं संवेदनशील झाली आहेत. सगळे तुमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतील. आम्ही बिहारच्या नालंदा विद्यापीछाचं पुनर्निर्माण केलं आहे. मी सगळ्या सरकारांना सांगेन की, भाषेमुळे देशाच्या टॅलेंटसमोर अडचणी येता कामा नयेत. यासाठी आपल्याला मातृभाषेला अधिकाधिक महत्त्व द्यायला हवं.
Addressing the nation on Independence Day. https://t.co/KamX6DiI4Y
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2024
अर्थसंकल्पात 1 लाख कोटी संशोधन आणि विकासासाठी दिले
जग वेगाने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण विज्ञानाला महत्त्व देणं वाढवायला हवं. चांद्रयानाच्या यशानंतर आपल्या शाळा-कॉलेजांमधून विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत नवीन उत्साह दिसून येत आहे. आम्ही त्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे अनेक निर्णय घेतले आहेत. अर्थसंकल्पात आम्ही 1 लाख कोटी रुपये संशोधन आणि विकासासाठी दिले आहेत.(PM Narendra Modi)
आम्ही केलेल्या सुधारणांचा लाभ ज्यांच्याकडे कुणी बघत नव्हतं, त्यांना झाला आहे. दलित, मागास, आदिवासी, दुर्गम भागात राहणारे अशा लोकांच्या गरजांची पूर्तता आम्ही केली आहे. सर्वांगीण विकासाचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचा सगळ्यात मोठा लाभ आपल्या तरुणांना होतो. त्यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतात. सर्वाधिक रोजगाराची संधी त्यांना याच काळात मिळाली आहे. मध्यमवर्गासाठी क्वालिटी ऑफ लाईफ उपलब्ध झाली, असं मोदी म्हणाले.
News Title- 75 thousand new posts in medical field said PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या-
“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन
लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा
आज स्वातंत्र्यदिनाचा दिवस ‘या’ राशींसाठी भाग्याचा; मोठा धनलाभ होणार
राज्यात पावसाची विश्रांती; आता थेट ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाचा जोर
पुरुषांच्या ‘त्या’ समस्या दूर करेल लसूण; जाणून घ्या इतर फायदे