बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

गुवाहाटी | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यामुळे याकाळात कोणाचा मृत्यू झाला तर पार्थिवाला खांदा देण्यासाठी माणसं देखील येत नसल्याचं पहायला मिळतंय. अशात एक माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे.

एका सुनेनं आपल्या कोरोनाबाधित सासऱ्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून रुग्णालयत नेलं. आसाममधील या महिलेचं सगळीकडेच कौतुक होत आहे. या घटनेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

75वर्षीय सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली. ते भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर निहारीकानं आपल्या सासऱ्यांना खांद्यावर उचलून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिला देखील कोरोनाची लागण झाली. यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांनी जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितलं आणि निहारीकाला होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला.

निहारीकाचा पती आणि थुलेश्वर दास यांचा मुलगा सुरज हा कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीकाच आपल्या सासऱ्यांची काळजी घेतीये.

थोडक्यात बातम्या- 

सेक्स रॅकेट प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक झाल्यानं बॅालिवूड हादरलं, वाचा संपूर्ण कारवाई

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी पालकांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला!

मोदींवर नरसिंहराव आणि मनमोहन सिंग भारी, गुंतवणूकदारांना मिळाली सर्वाधिक कमाई

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 10 वर्षात 16 लाख मिळवा!

“जेवल्याशिवाय जाऊ नका”, खडसेंचा आग्रह; फडणवीस म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More