sanjay raut - सत्ता भाजपच्या नावाची, आम्ही फक्त नावापुरते- शिवसेना
- नाशिक, महाराष्ट्र

सत्ता भाजपच्या नावाची, आम्ही फक्त नावापुरते- शिवसेना

मुंबई | सत्ता भाजपच्या मालकीची आहे, आम्ही फक्त नावापुरते आहोत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या संघटनात्म बैठकीसाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. 

काँग्रेस-राष्ट्रवादी नव्हे भाजप सातत्याने शिवसेनेलाच टार्गेट करतो. त्यामुळे आमचा प्रमुख विरोधी पक्ष भाजप आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या अफवा ऐकतो आहे. खरंच होऊ द्या मंत्रिमंडळ विस्तार मग बघू, असं म्हणत त्यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही तिरकस भाष्य केलं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा