बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाला रोखण्यासाठी लेंसेटच्या तज्ज्ञांनी भारताला दिले ‘हे’ 8 महत्वाचे सल्ले!

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच ‘डेल्टा प्लस’ प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच कारण बनू शकतो, अशी शक्यता देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लेंसेट या नियतकालिकाने भारताला कोरोनाविरोधात लढण्यासाठी 8 महत्त्वपूर्ण सल्ले दिले आहेत. भारताने कोरोनाविरोधात त्वरित पावले उचलण्याची गरज आहे, असे लेंसेटच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

एक पारदर्शक राष्ट्रीय मूल्य नीती असली पाहिजे. त्याअंतर्गत वैद्यकीय सेवांशी संबंधित सर्व आवश्यक आरोग्य सेवा ज्यामध्ये अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन, आवश्यक औषधे आणि रुग्णालयातीद देखभालीच्या शुक्लाची मर्यादा निश्चित झाली पाहिजे. रुग्णालयाच्या मेंटेनन्ससाठी कुठल्याही प्रकारची रक्कम आवश्यक समजली जाता कामा नये. सर्व लोकांना सध्याच्या आरोग्य विमा योजनांच्या माध्यमातून कव्हर केले पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

कोरोनामुळे लोकांना घर चालवण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने अशा लोकांच्या खात्यांमध्ये रोख रक्कम जमा करणं आवश्यक आहे. सर्व श्रमिकांना कामावर टिकवून ठेवण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य व्यवस्थेतील सर्व उपलब्ध साधनांच्या व्यवस्थेची आवश्यकता आङे. यामध्ये खासगी क्षेत्राचीही मदत घेतली पाहिजे. विशेषकरून पुरेशी व्यक्तिगत उपकरणे, विमा आणि इतर गोष्टींवरही लक्ष देण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने सर्वात आधी लस कुणाला द्यावी याचा निर्णय घ्यावा, लसीच्या पूरवठ्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर हे प्रमाण वाढवता येईल. लसीकरण एक सार्वजनिक हित आहे. त्याला औषधांच्या बाजारव्यवस्थेवर सोडून देता येणार नाही. म्हणजेच बाजाराला लसीची किंमत निश्चित करता येऊ नये, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

आई बापाच्या कष्टाचं चीज, पंढरपुरातील मजूराच्या पोराची इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

“शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली”

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More