Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, 8 गाड्या एकमेकांना धडकल्या

पुणे | पुणे शहरातील नवले पुलाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास आठ गाड्यांची धडक झालीये. या अपघातात एका मोठ्या टँकरने पेटही घेतला.

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 जणं जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी तातडीने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

ब्रेक फेल झाल्याने चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर हा ट्रक रस्त्यावर असलेल्या इतर वाहनांना जाऊन धडकला.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची आणि इतर जखमींची ओळख अजून पटलेली नाही. अपघातामध्ये पेट घेतलेल्या वाहनाची आग अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून विझवण्यात आलीये.

महत्वाच्या बातम्या-

कानाला, हृदयाला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती केलीये; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

अर्जेंटीना फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची होणार चौकशी

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश; उद्या घेणार पत्रकार परिषद

तिसऱ्या वनडे पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; 2 प्रमुख खेळाडू संघाबाहेर

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या