मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयावर 80 हजार बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते. मात्र आता या बनावट अकाऊंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात येणारे.
सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या सांगण्यानुसार, लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.
या बनावट अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी तसंच त्यांना शिवीगाळ करण्यात येत होती. यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या नावाने देखील बनावट अकाऊंट काढण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल – उदय सामंत
“एमपीएससीची परीक्षा घेणं ठाकरे सरकारचं षडयंत्र”
‘…म्हणून हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले’; योगी सरकारनं दिलं स्पष्टीकरण