osama bin laden  - लादेनही बघायचा 'टॉम अॅण्ड जेरी' आणि अजय देवगणची गाणी
- विदेश

लादेनही बघायचा ‘टॉम अॅण्ड जेरी’ आणि अजय देवगणची गाणी

नवी दिल्ली | कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याच्या संगणकात अजय देवगण आणि काजोलचं अजनबी मुझ को इतना बता, तू चाँद है पूनम का ही गाणी आढळून आली.

2011मध्ये अमेरिकन कमांडोजने लादेनचा खात्मा केला. त्यानंतर तो ज्या घरात लपला होता तिथं काही संगणक मिळाले, त्यामध्ये स्टोअर केलेल्या अनेक गोष्टी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणानं जाहीर केल्यात.

टॉम अॅण्ड जेरी कार्टूनचे व्हिडीओ, ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार या लहान मुलांच्या गाण्यांचा व्हिडीओ असा 175 जीबींचा डेटा जप्त केलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा