बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात

औरंगाबाद | कोरोनाने सध्या राज्यभर हैदोस घातला आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राणा गमवाव लागला आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना नगर जिल्ह्यातील शिराळ चिचोंडी येथील 85 वर्षीय भीमाबाई तुपे यांनी कोरोनावर मात केली आहे.

भीमाबाई तुपे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एचआरसीटी करण्यास सांगितलं. तेव्हा स्कोअर होता 15 तर ऑक्सिजन पातळी 84-85 च्या आसपास होती. भीमाबाईंचे वय जास्त, त्यात रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे पाथर्डीतील रुग्णालयांनी त्यांना नगरला जाण्याचा सल्ला दिला. आजीला नगरला घेऊन गेल्यानंतर दोन दिवस नातू अक्षय नानासाहेब तुपे फिरले. एकाही रुग्णालयात ऑक्सिजनचा बेड शिल्लक नसल्याने हताश होऊन औरंगाबादला एका खासगी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला.

खासगी हॉस्पिटलने बेड, ऑक्सिजन असल्याचं सांगितलं. यानंतर आजीला घेऊन नगरहून ते औरंगाबादला आले. मात्र आजीला पाहताच हॉस्पिटलने अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. यानंतर नातवाने मिनी घाटीला संपर्क केला. दुसऱ्या दिवशी मिनी घाटीतून बेड शिल्लक असल्याचा फोन आला.

नातवाने आजीला चिकलठाणा येथील मिनी घाटीला आणलं. यानंतर आजीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. ऑक्सिजन लेव्हल 99 ते शंभरवर आली. यानंतर आजीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा

18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

पुण्यात कॅालेजला जाता येता झाली ओळख, मुलगी गर्भवती झाल्यावर बलात्कार झाल्याचं उघड

‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’; मानसी नाईक भडकली

राज्यातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More