bar bar - 'बार बार फेंको, हजार बार फेंको', भाजपची चिंता वाढवणारं गाणं व्हायरल
- महाराष्ट्र, मुंबई

‘बार बार फेंको, हजार बार फेंको’, भाजपची चिंता वाढवणारं गाणं व्हायरल

मुंबई | भाजप सरकारविरोधात टीकेचे सूर उमटत असताना आता ‘बार बार फेंको, हजार बार फेंको”, हे नवं गाणं भाजपची चिंता वाढवताना दिसतंय. ‘द बँड’ नावाच्या यूट्यूब चॅनेलने हे गाणं अपलोड केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आश्वासनांना या गाण्यातून लक्ष्य करण्यात आलंय. तसेच नोटबंदी आणि जीएसटीसारख्या मुद्द्यांवरही या गाण्यातून आसूड ओढण्यात आलेत.

या गाण्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच अर्थमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यावरही टीकास्त्र सोडण्यात आलंय. हे गाणं आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा