Chandrakant Patil 1 - रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही- चंद्रकांत पाटील
- नागपूर, महाराष्ट्र

रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही- चंद्रकांत पाटील

परभणी | रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, पाऊस पडला की खड्डे पडतात, असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते परभणीत बोलत होते.

याआधीच्या सरकारच्या काळात भरीव निधी मिळाला नाही, त्यामुळे चांगले रस्तेच बनले नाहीत. खड्डे जुनेच आहेत नवीन खड्डे पडले नाहीत, असही ते म्हणाले.

15 डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परंतु खड्ड्यांचं खापर आधीच्या आघाडी सरकारवर फोडलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा