कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

8th Pay Commission | 2024 च्या अर्थसंकल्पापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आवी आहे. 8व्या वेतन आयोगाचा (8th Pay Commission) प्रस्ताव तयार करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. येत्या 23 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे विद्यमान वेतन, भत्ते आणि लाभांचा आढावा घेण्यात आला आहे. आगामी अर्थसंकल्पामध्ये या प्रस्तावाचा समावेश करावा यासाठी हा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.

दर दहा वर्षांनी एक केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो. हा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा, भत्त्यांचा, लाभांचा आढावा घेऊन महागाईच्या आधारे आवश्यक ते बदल सुचवतो. यानुसार सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. यामुळे आगामी अर्थसंकल्पात 8 व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेतन रचना काय असेल?

शिवगोपाल मिश्रा म्हणाले की, आता काळ बदलला आहे, अशा परिस्थितीत पगाराचा आढावा घेण्यासाठी 1 दशक हा मोठा काळ आहे. त्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यानुसार बदल करण्यात यावेत. मात्र, 8व्या वेतन आयोगाच्या वेतन रचनेची कोणतीही रूपरेषा अद्याप तयार करण्यात आलेली नाही. यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोरोनानंतर महागाई वाढली आहे. हे कोविडपूर्व चलनवाढीच्या पातळीपेक्षाही जास्त आहे. 2016 ते 2023 या कालावधीतील दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किरकोळ किमतींची तुलना केल्यास, स्थानिक बाजारपेठांमध्ये त्या 80 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची गरज आहे, असंही मिश्रा म्हणालेत.

केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अपडेटच्या प्रतीक्षेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमद्वारे महिन्याला कमवा 10 हजार रुपये; जाणून घ्या अधिक

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची धुरा कुणाकडे असणार?, मोठी माहिती आली समोर

“लाडका भाऊ योजना ही 50 वर्षांआधीची जुनी योजना”; ‘या’ नेत्याचा दावा

“माझ्यासोबत धोका..”, लग्नाच्या काही दिवसांनीच सोनाक्षीच्या नवऱ्याने केलं असं काही की..

1500 रूपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर चालेल का?, संजय राऊतांचा हल्लाबोल