बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील मालाड भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

मुंबई | मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.

मुंबईत बुधवारी रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एक दुमजली घर अचानक जवळच्या दुमजली इमारतीवर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिलीये.

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे, असं पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरची सेक्स टेप लीक, हॉटेलमध्ये बनवलेल्या या अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ लीक

जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या!

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

प्रसिद्ध अभिनेता बोमन इरानी यांच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More