बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क एकाच कंपनीच्या, एकाच नंबरच्या 9 रिक्षा! पोलिसही झाले अवाक

बीड | वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, बीडमध्ये (Beed) चक्क एकाच नंबरच्या 9 रिक्षा धावत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरु केली असून सर्व रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. या रिक्षाच्या चालकांना आणि मालकांनाही आपल्या रिक्षाच्या नंबरच्या अजूनही काही रिक्षा आहेत याची कल्पना नव्हती.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिक्षांवर एमएच-23, टीआर-311 असा नंबर आहे. डीबी पथकाने कारवाई करून या रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. या 9 रिक्षांना एकच नंबर कसा मिळाला याबाबत पोलिस तपास करत आहेत. या रिक्षा एकतर चोरीच्या असाव्यात किंवा एकाचं परमीटवर या नऊही रिक्षा चालवण्यात येत असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.

बीडमधील गेवराई शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला ( Regional Transportation Department) माहिती दिली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानंतरच याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.

या प्रकरणानंतर शहरात अजून किती रिक्षा अशा पद्धतीने फिरत आहेत किंवा याच नंबरच्या अजून काही रिक्षा आहेत. याबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शिवाय प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाला दिली जाणाऱ्या परवानगी विषयी देखील चौकशी सुरु आहे. या सर्व घटनेनंतर परिवहन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More