बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड

मुंबई | अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील मुख्य संशयित सचिन वाझे यांची प्रकृती पुन्हा चिंतजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 90 टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.

विशेष न्यायालयात सचिन वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांनी वाझेंसाठी वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. सचिन वाझे यांच्या कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे वाझे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयानं सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. तर वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये 90 टक्के ब्लॉकेज आढळून आले आहेत. वाझे यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता न्यायालय काय निर्देश देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मागच्या आठवड्यात सचिन वाझे यांची प्रकृती अचानक खराब झाली होती. तेव्हा रात्रीच्यावेळी त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री 10:30 च्या सुमारास एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेलं होतं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर रात्री 1.30 वाजता वाझे यांना परत आणण्यात आलं होतं.

दरम्यान, या आधी चौकशीदरम्यान दोन, तीन वेळा सचिन वाझे यांची तब्येत बिघडली होती. त्यावेळी देखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या

भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीचा आराम करण्याची डॉक्टरांची सूचना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More