Tushar Kamathe - बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक पोलिसांना शरण
- पुणे, महाराष्ट्र

बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक पोलिसांना शरण

पिंपरी | महापालिका निवडणुकीत बनावट कागदपत्र सादर करणारा भाजप नगरसेवक अखेर पोलिसांना शरण आला आहे. तुषार कामठे असं या नगरसेवकाचं नाव आहे. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली होती. 2017च्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बारावी उत्तीर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडल्याची तक्रार त्यांनी केली होती. 

27 ऑक्टोबरला सचिन यांनी तक्रार केली तेव्हापासून तुषार कामठे फरार होता. त्याचा मोबाईलही लागत नव्हता. अखेर अटकेच्या भीतीने तो पोलिसांना शरण आला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा