बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर वापराविना 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

पुणे | कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना लहान मोठ्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अधिक भार पडताना दिसत आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीरचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. पण रेमडेसिवीर न वापरता देखील कोरोना बरा होऊ शकतो, हे वेळोवेळी सिद्ध देखील झालं आहे. यातच आता रेमडेसिवीर न वापरता पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने त्याच्या वापराशिवाय साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्ण बरे होऊन वसंतराव पिसाळ आणि सुचेता केसरकर या ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 6 रुग्णांना मंगळवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. कात्रज घाटात हॉटेल रॉयल येथे असलेल्या साई स्नेह कोविड सेंटर येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळया वाजवत, नातेवाईकांच्या उपस्थितीत 6 जणांना डिस्चार्ज दिला आहे.

कोविड साथीची परिस्थिती असाधारण आहे. खासगी कोविड उपचार केंद्र परिस्थितीची हाक ऐकून प्रतिकूल परिस्थितीत उभी करण्यात आली. साई स्नेह कोविड सेंटर हे हॉटेल रॉयलचे रुपांतर हॉस्पिटल मध्ये करून उभारण्यात आले. 15 एप्रिलला हे सेंटर सुरु झालं. येथं 80 रुग्ण दाखल होऊ शकतात. त्यातील 40 जणांना ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देता येते. कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर नातेवाईकांना एरवी नीट माहिती मिळत नाही. नातेवाईकांना रुग्णाच्या प्रगतीची माहिती देण्याची, समुपदेशनाची खास सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिली आहे, असं डॉ. सुनील जगताप यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांना प्रोटोकॉल नुसार आणि आयसीएमआर गाईडलाईन नुसार उपचार करण्यात आले आहेत. रक्त पातळ होण्याची औषधे देण्यात आली आहे. त्याचबरोबर अँटी फंगल ट्रीटमेंट देण्यात आली. डॉ. सुनील जगताप यांनी कोविड रूग्णांवर उपचार करीत असल्यानं सुटी न घेता बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन हा संस्मरणीय दिवस साजरा केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More