Top News मनोरंजन

94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला!

औरंगाबाद | अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 94वं साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, “यंदा साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीने नाशिकच्या एकाच संख्येला निमंत्रण पाहणीसाठी निवडलय. या ठिकाणी भेट देऊन आवश्यक ती पाहणी केली आणि आपला अहलवाल महामंडळाला दिला आहे.”

ते पुढे म्हणाले, “94व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचं एक, पुण्याचं एक तर अमळनेरवरुन एक अशी निमंत्रणं आम्हाला मिळाली होती. दरम्यान यामध्ये मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी करण्यात आली होती.”

अखेर साहित्य महामंडळाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचं निमंत्रण स्वीकारून 94व्या साहित्य संमेलनासाठी त्याची निवड केलीये, असल्याचं त्यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

KGF 2 चा टीझर वेळेच्या आधीच रिलीज; रचला नवा रेकाॅर्ड, पाहा व्हिडीओ

लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या