arun jaitley - लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर फार काळ जिवंत राहणार नाही!
- देश

लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर फार काळ जिवंत राहणार नाही!

सूरत | लष्कर-ए-तोयबाचा कोणताही कमांडर फार काळ जिवंत राहणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत. ते गुजरातमधील सूरत येथे बोलत होते.

26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण होण्याच्या 2 दिवस आधी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची पाकिस्तानच्या नजरकैदेतून सुटका झाली, त्यावर भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.

दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतेही स्थान नाही, अशा शब्दात संपूर्ण जगानं पाकिस्तानचा निषेध केलाय, असंही जेटली यांनी सांगितलं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा