पुणे | पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा जानेवारीपासून सुरु होणार आहेत. 9 ते 12 या तुकडीच्या शाळा 4 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार यासंदर्भातील आदेश दिलेत. कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचं पालन करून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
शाळा सुरु करताना 10 नोव्हेंबर 2020 रोजी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि अटींचं पालन करणं बंधनकारक आहे.
त्याचप्रमाणे शाळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, साबण, पाणी या वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
आयपीएलच्या स्पर्धेत १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता, परंतु…
“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट
राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडी
“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”
पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार