आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीने उचललं धक्कादायक पाऊल
नवी दिल्ली | रविवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रतापपुरा गावात प्रत्येक माणसाला निशब्दः करुन टाकणारी घटना समोर आली आहे. एका 10 वर्षाच्या चिमुकलीने तीच्या राहत्या घरी दरवाजाच्या अँगलला फास बांधून आत्महत्या केली आहे. याकारणामुळे पुर्ण गाव सुनसान झालं आहे.
संबंधित मुलीच्या आईचे दीड वर्षांपुर्वी निधन झालं होतं. त्यानंतर वडिलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून ते सुद्धा कुठेतरी निघून गेले आहेत. ही मुलगी तीच्या 2 बहिणी आणि एका भावासोबत राहत होती. यातील सर्वात मोठी बहिण 18 वर्षांची असून लहान बहिण भावांचा सांभाळ करण्यासाठी एका कपड्याच्या दुकानात काम करते.
रविवारी संबंधित मुलीची मोठी बहिण रोजप्रमाणे कामावर गेली असता त्या मुलीचं तीच्या लहान भावासोबत किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं. हे भांडण काही प्रमाणत मारहाण पर्यंत देखील पोचलं. हे भांडणं तीच्या इतकं जिव्हारी लागलं की भांडणांनंतर तीने घराच्या दाराच्या वरच्या बाजूला असलेल्या अँगलला दोरी लावत फास घेतला.
दरम्यान, संबंधित मुलीचं वय 10 वर्ष असून तीच्या लहान बहिणीचं वय दोन वर्ष आहे तर तीचा लहान भाऊ 5 वर्षांचा आहे. मात्र झालेल्या घटनेमुळे मुलीची मोठी बहिण खुप खचली गेली आहे. एवढचं नाही तर या घटनेनं संपुर्ण गावाला हदरवून टाकलं आहे.
थोडक्यात बातम्या-
अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!
“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”
“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल- शरद पवार
‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती
Comments are closed.