पोरीच्या धाडसाला सलाम; आजीसाठी 10 वर्षांची नात चोरासोबत भिडली, पाहा व्हिडीओ

पुणे | पुण्यातील शिवाजीनगर (Pune Shivaji Nagar) इथल्या मॉडल कॉलनी इथे रात्री आठ वाजता धक्कादायक घटना घडली आहे. एक वृद्ध महिला आपल्या दोन नातींसह रस्त्याने पायी घरी जात होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या चोराने वृद्ध महिलेच्या बाजूला येऊन चैन पळवण्याचा प्रयत्न केला.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने वृद्ध महिलेला थांबवलं आणि संधी बघताच वृद्ध महिलेच्या गळ्यात सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान दाखवत त्या वृद्ध महिलेने चोरट्याचा हाथ घट्ट पकडून ठेवला. अचानक घडलेल्या या घटनेने वृद्ध महिलेबरोबर असलेल्या दोन छोट्या मुली थोड्याश्या घाबरतात. पण त्यातली एक मुलगी धाडस दाखवत आजीच्या मदतीला धावली आणि तीने चोरट्याला हातातल्या बॅगने मारायला सुरुवात केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. या छोट्या नातीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-