संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा
बुलडाणा | खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत. संभाजीराजेंच्या आमरण उपोषणास राज्यभरातून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने संभाजी महाराजांची तब्येत खालावली आहे. त्यातच आता संभाजी छत्रपतींना पाठींबा देण्यासाठी एका 12 वर्षीय मुलाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या गाडीचा ताफा अडवला आहे.
शेगाव येथील शिवाजी चौकामध्ये 12 वर्षीय मुलाने ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा ताफा अडवला आहे. नितीन राऊत यांचा ताफा अडवून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले आहे. 12 वर्षीय मुलाने ताफा अडवल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. संभाजी महाराजांच्या मागण्यांना पाठींबा देण्यासाठी या मुलाने ताफा अडवल्याचं समोर आलं आहे.
संभाजीराजेंच ब्लडप्रेशर, शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उपोषणावर असल्याने त्यांनी इंजेक्शन घेण्यास नकार दिला आहे. आज उपोषणामुळे होणारा त्रास मी समाजासाठी सहन करणार आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, संभाजीराजेंना पाठींबा दर्शविण्यासाठी बुलडाणा दौऱ्यावर असणाऱ्या 12 वर्षीय मुलाने ऊर्जामंत्र्यांचा ताफा अडवला त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे.
थोडक्यात बातम्या-
नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…
“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”
…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ
‘नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती’; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य
Comments are closed.