Top News

अभ्यासावरून पालक ओरडल्याने 14 वर्षांच्या मुलाने घर सोडलं; घरातून चोरले दीड लाख

वडोदरा | अभ्यास न केल्याने पालकांचा ओरडा बसतो आणि अनेकदा या ओरडण्यामुळे मुलं मनात राग धरतात. असंच एका 14 वर्षांच्या मुलाने अभ्यासावरुन पालकांचे सतत बोलणे ऐकवं लागतं या रागातून स्वतःच्याच घरी चोरी केलीये.

गुजरातमधील वडोदरा याठिकाणी ही धक्कादायक घटना घडलीये. मुख्य म्हणजे या चोरलेल्या पैशांतून या तो गोव्याला गेला आणि तिथल्या क्लबमध्ये पैसेही खर्च केले.

अभ्यासावरून सारखं घरी आई वडील बोलत असल्याने त्याने घर सोडलं. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी घरातून दीड लाख रूपये चोरीला गेले असल्याचंही पोलिसांना सांगितलं.

मुलाकडचे पैसे संपत आल्यानंतर त्याने पुन्हा गुजरातला जायचा निर्यण घेतला. मात्र गुजरातमध्ये गेल्यावरही घरी जायचं नाही हे त्याने ठरवलं. म्हणून त्याने पुणे गाठलं. अखेर मोबाईल ट्रेसिंगवरून मुलाचं लोकेशन समजलं. पुणे पोलिसांनी 25 डिसेंबरला या मुलाला वडोदरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. नंतर या मुलाला शनिवारी घरी सोडण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास! अजिंक्य रहाणेने केली डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

भारत-ब्रिटन विमान प्रवासावरील बंदीत वाढ होणार; उड्डाणमंत्र्यांचे संकेत

हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा; भाजप आमदाराची टीका

10 वर्षांपासून स्वतःला खोलीत बंद ठेवलं; उच्चशिक्षित 3 भावंडांची कहाणी

मोठी बातमी! रजनीकांत राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या