Top News महाराष्ट्र मुंबई

वर्षाचा पहिला दिवसच ठरला शेवटचा; काळजाचा थरकाप उडवणारी घटना!

मुंबई | नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांनी काहीना काही संकल्प केला असेल. मात्र मुंबईत वसईमध्ये एका तरूणीच वर्षाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला आहे. काळजाचा थरकाप उडवणारी वसईमध्ये घडली आहे.

अल्फिया सय्यद असं तरूणीचं नाव असून ती बारावीचे शिक्षण करून घरच्यांना हातभार लावावा म्हणून एका ठिकाणी काम करत होती. रोजच्याप्रमाणे ती सकाळी 10 वाजता वर्षाच्या पहिल्या दिवशी वसईच्या रेंज नाक्याजवळ रस्ता क्रॉस करत होती.

रस्ता क्रॉस करत असताना तिला एका मोटारसायकलवाल्याने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत अल्फियाला आपला जीव गमवावा लागला आहे. अल्फियाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल असून मोटारसायकल आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, अल्फियाच्या मृत्युने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून दु:खाचा डोंगर वर्षाच्या सुरूवातील त्यांच्या घरावर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या-

“नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करत आहेत”

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

सोनमची कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या