बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

मुंबई | कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. त्यात रोज कित्येक लोकांचा जीव जात आहे. अशा स्थितीत एका 2 महिन्याच्या बाळानं हृदयविकारासोबतच कोरोनावरही मात केल्याची घटना समोर आली आहे. कार्डियाक सर्जरीसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अवघ्या 2 महिन्याच्या बाळानं दोन जीवघेण्या आजारावर मात केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून ही बाब चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं बोललं जात आहे.

नंदुरबार येथील रहिवासी असणाऱ्या कृष्णा अगरवाल यांच्या 2 महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळं त्यांनी बाळावर पुढील उपचार करण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी केली जात असतानाच, बाळाला कोरोना झल्याचं आरटी पीसीआर चाचणीतून समोर आलं. हे समजताचं अगरवाल परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली होती. मात्र, या बाळानं दोन्ही आजारांवर मात केली आहे.

बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच शस्रक्रिया करण्याची वेळ लांबणीवर टाकण्यात आली. बाळाला पंधरा दिवस रुग्णालयातचं आयसोलेशनमध्ये ठेवून तिच्यावर उपचार करण्यात आले. या दोन्ही गंभीर आजारांमुळ तिची ऑक्सिजनची पातळी 86 टक्क्यांपर्यंत खालावली होती. पण 15 दिवसांत तिनं कोरोनावर मात केली. त्यानंतर बाळावर हृदयविकारासंबंधित कार्डियाक सर्जरी केली. बराच काळ चाललेल्या शस्रक्रियेला बाळानं चांगला प्रतिसाद दिला असून सध्या बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.

दरम्यान, बाळाची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांनाही आयसोलेट करण्यात आलं होतं. तर बाळाच्या प्रकृतीत काही बिघाड झाल्यास तातडीनं सर्जरी करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम सज्ज ठेवण्यात आली होती. पण सुदैवानं बाळाला काहीही झालं नाही.

थोडक्यात बातम्या

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

“येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार”

‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’; जवानाचा काळजाला पाझर फोडणारा आक्रोश

#सकारात्मक_बातमी | एक किडनी, HRCT स्कोअर 12; पुण्यातील आजींची कोरोनावर यशस्वी मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More