Top News महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं

मुंबई | भारतीय नौदलाचा जवान 27 वर्षीय सुरज कुमार दुबे याचं अपहरण करून त्याला जाळण्यात आलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यु झाला आहे.

सुरज कुमार दुबे हा जवान आयएनएस कोयंबटूरच्या लीडरशीप ट्रेनिंग एस्टेबलिस्मेंटमध्ये तैनात होता. तो 30 जानेवारीला सुट्टी संपल्यानंतर तो कामावर जाण्यासाठी कोयंबटूर येथे जात होता. तेव्हा तो रांचीहून हैद्राबादला पोहोचला. मात्र त्यानंतर त्याचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ होते. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तेव्हा पोलिसांनी तपास चालू केला.

त्यानंतर सुरज कुमार दुबे हा मुंबईत जखमी अवस्थेत आढळून आला. तेव्हा त्याला पालघरच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं मात्र त्याचं शरीर भाजलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी नेव्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र नेव्ही हॉस्पिटलमध्ये रात्री त्याचा मृत्यु झाला.

दरम्यान, सुरजला जाळून नाल्यात फेकून देण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे त्याचं अपहरण कोणी केलं आणि त्याला का जाळलं हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या

धावत्या ट्रेनमध्ये या मराठी अभिनेत्रीने छैया छैया गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ

‘बिग बॅास’ शो अर्धवट सोडल्यास स्पर्धकाला चुकवावी लागते ‘एवढी’ किंमत

“भाजपबरोबर जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत म्हणून…”

…तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या