बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

मुंबई | मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिला RPF जवानाने एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. या घटनेनंतर आरपीएफ जवानाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

50 वर्षाची महिला रेल्वेमध्ये चढत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यामुळे ती रेल्वे आणि रेल्वे रुळाच्यामध्ये अडकत होती. याचवेळी कर्तव्यावर असणारी आरपीएफ महिला जवानने महिलेकडे धाव घेतली.

यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला आरपीएफ जवानाने तातडीने धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले. यामध्ये कोणालाही कसलीच दुखापत झाली नसून महिलेला महिला जवानने आराम करण्यास बसवलं.

दरम्यान, धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं धाडस करु नका, अशी सुचना वारंवार रेल्वे प्रशासन देत आहे. धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचं नको ते धाडस करुन अनेक जण जीवाला मुकतात. त्यामुळे कोणता जरी प्रसंग घडला तरी धावत्या रेल्वेमध्ये चढू नका, असं देखील रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

‘हे स्टॉक्स दिवाळीच्या दिवशी खरेदी करा’; SMC Global चा सल्ला

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More