मुंबई | बॉलिवूड मध्ये डेटिंग, फ्रेंडशिप, लव्ह, अफेअर, लग्न आणि त्यानंतर घटस्फोट ह्या गोष्टी घडतच असतात. मात्र काही अभिनेत्रींनी घटस्फोट झाल्यानंतर घेतलेल्या पोटगीची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यामध्ये मलायका अरोरा, अमृता सिंह, रीना दत्त, सुजैन रोशन यांचा समावेश आहे.
2012 मध्ये हृतिक रोशन आणि पत्नी सुजैन खान यांचा घटस्फोट झाला. हृतिकनं सुजैनला 380 कोटी रुपये पोटगी म्हणून दिल्याची माहिती आहे.
पहिली पत्नी रीना दत्तपासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खाननं रीनाला 50 कोटी रूपये दिले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुलं आहेत. नंतर अमिरनं किरण राव सोबत लग्न केलं.
सैफनं अमृता सिंह घटस्फोट झाल्यानंतर 5 कोटी रूपये दिल्याची माहिती आहे. तसेच सैफनं असंही सांगितलं होतं की तो मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत त्याच्या संगोपनासाठी प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये देईल.
घटस्फोट घेताना मलायकानं अरबाजला 10 ते 15 कोटी मागितले होते. मात्र कोर्टाने तसे पैसे देण्याचे आदेश दिले किंवा अरबाजनं तिला रक्कम दिल्याच्या कोणत्याही माहितीची पुष्टी झालेली नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट
सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एंट्री; केली मोठी घोषणा
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदारावर भाजप मेहेरबान, दिली ही संधी
भाजपच्या आमदारानेही घेतला कोरोनाचा धसका; मास्क घालून विधानभवनात प्रवेश
गरीबांच्या पोरांनी साहेब व्हायचं स्वप्न बघायचं की नाही?; राम सातपुतेंचा सवाल
Comments are closed.