नवी दिल्ली | एक बाळ एक नव्हे, दोन नव्हे तर तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर म्हणाले की अशा प्रकारची केस त्यांनी पहिल्यांदाच पाहिली आहे. या बाळाचा जन्म इराकच्या उत्तर भागातील मोसुलमध्ये झाला आहे.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधरणतः जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या हाताच्या नाहीतर पायाच्या बोटांची संख्या वाढते. मात्र या घटनेमध्ये बाळाच्या चक्क प्रायवेट पार्टची संख्या वाढली आहे. या बाळाचे 2 गुप्तांग 2 सेमी लांब आहेत तर एक गुप्तांग 1 सेमी लांब आहे. तसेच हे मुख्य गुप्तांगाला जोडून आले आहेत. या कारणामुळे या बाळाला कोणत्याही शारीरिक कार्यात भाग घेता येणार नाही.
डॉक्टरांच्या मते असं होण्यामागचं कारण एकतर प्रेग्नेंसीदरम्यान एखाद्या अडचणीमुळे नाहीतर अनुवंशिक गोष्टीमुळे असेल. मात्र बाळाला असलेल्या 3 गुप्तांगांपैकी 2 गुप्तांग ऑपरेशन करुन काढता येऊ शकतात. याला ‘सुपरनूमेररी’ असं म्हणतात. यामध्ये बाळ 2 गुप्तांगासोबत जन्माला येते. 3 गुप्तांगासोबत जन्माला आलेलं हे बाळ दुर्मिळ असून ही आजपर्यंतची पहिली घटना आहे.
दरम्यान, जगात एकूण 50 ते 60 लाख बाळांच्या जन्मामध्ये अशी केस पाहायला मिळते. त्यात सुद्धा त्या बाळाला 2 गुप्तांग असतात. 3 गुप्तांगासोबत जन्म झालेल्या या बाळाची केस पहिलीच आहे.
थोडक्यात बातम्या-
“तुम्ही फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?”
मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं
“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”
रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल
पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.